इंडियन गॅलॅक्सी फाऊंडेशनच्या वतीने नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये आंतरराष्ट्रीय सौदर्य दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यशाळा व पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन केले. फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. मनिष शंकरराव गवई, श्रीमती कृष्णा वाढेर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
G20 कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी रोमांचित आहे, जिथे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील नेते जागतिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येतात. आर्थिक वाढ, शाश्वत विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर रचनात्मक संवादांमध्ये योगदान देण्यासाठी उत्सुक आहे. एकत्रितपणे, आपण चांगल्या भविष्यासाठी मार्ग तयार करू शकतो.
२४ तास अखंड वीजपुरवठ्यासाठी ४ हजार ५०० कोटींचा आराखडा. केंद्र सरकार अनुदान देणार, जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत चर्चाठाणे जिल्ह्यातील संपूर्ण वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करून २४ तास अखंड वीजपुरवठा करण्यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपयांचा आराखडा करण्यात येत आहे. या आराखड्यासाठी केंद्र सरकारकडून ६० टक्के अनुदान दिले जाणार आहे. माझ्या अध्यक्षतेखाली जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या आराखड्यात अन्य लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करून केंद्र सरकारकडे पाठविण्याचे निर्देशही दिले. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार गणपत गायकवाड, आमदार रमेश पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, एमएसईडीसीचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, सुनील काकडे आदींसह महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारकडून देशभरातील २०३० पर्यंत वीज यंत्रणा आधुनिकीकरण व बळकटीकरण करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार ठाणे जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या भांडूप, कल्याण आणि वसई परिमंडळातील ३४ लाखांहून अधिक ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरिंग, वीज हानी कमी करणे आणि सिस्टीमची क्षमता वाढविणे आदी कामे केली जातील. या योजनेत ठाणे जिल्ह्यासाठी ४५०० कोटींचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील शहरे व सुमारे ८५० गावांमध्ये वीज वितरणाचे जाळे मजबुत करण्यात येणार आहे. त्यातील १२०० कोटींची कामे प्राधान्याने पहिल्या दोन वर्षात केली जातील. तर उर्वरित कामे पाच वर्षांमध्ये पूर्ण होतील.
सध्या नवी मुंबईत ७, डोंबिवलीत ६, ठाण्यात ७ आणि कल्याणमध्ये १२.५ टक्के वीजगळती आहे. वीज गळतीचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी केल्यास केंद्र सरकारकडून अनुदान मिळेल.
राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार कबड्डीचे कल्याण येथील मार्गदर्शक प्रशांत परशुराम चव्हाण यांना मिळाला. श्री. चव्हाण यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्याच्या महायुतीत सहभागी पक्षांचे वरिष्ठ नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत या बैठकीला माझीही उपस्थिती होती.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६५ व अधिमंडळाच्या सभेला उपस्थित राहून प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी खासदार राजेंद्र गावित होते. या वेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार राजेश पाटील, बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सीईओ अरुण गोंधळी यांची उपस्थिती होती.
जिल्हा बँकेचे माध्यमातून शेतकरी उभा राहिला पाहिजे, हे ध्यानात घेऊन संचालक मंडळाने कार्य करावे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना अवघ्या साडेनऊ टक्के व्याजदराने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होत आहे, ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सुवर्णसंधी आहे. त्याचा लाभ तरुणांनी घ्यावा, असे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारतर्फे आयोजित आठव्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देशभरातील ५१ हजार बेरोजगार तरुण-तरुणींना आज सरकारी नोकरी मिळाली. बेंगलुरू एसटीसी येथे झालेल्या कार्यक्रमात माझ्या हस्ते नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले. या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच देशउभारणीत योगदान देण्याचे आवाहन केले. नियुक्त पत्र मिळालेले कर्मचारी गृह मंत्रालयाच्या विविध संस्था, हवालदार, उपनिरीक्षक आणि बिगर जनरल ड्युटी श्रेणीत रुजू होणार आहेत.
फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघाच्या वतीने रोटरी क्लब ऑफ सेंट्रल कल्याण, रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्स यांच्या वतीने माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उपस्थित राहून उपक्रमाबद्दल पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपाचे कल्याण पश्चिम शहराध्यक्ष वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे आदींची उपस्थिती होती.
केंद्र सरकारच्या माध्यमातून भिवंडी येथे माता-बाल रुग्णालयाला मंजुरी मिळाली असून, ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर भिवंडी तालुक्यात ३ आरोग्य केंद्रे व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यासाठी १७ कोटींचा असा एकूण ७५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या रुग्णालयासंदर्भात भिवंडी येथे आज आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्यासह आरोग्य विभाग आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पंचायती राज परिषदेच्या निमित्ताने दमणवाडा येथील लायब्ररी भवनला भेट दिली. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाशजी विजयवर्गीय, माजी राज्यसभा सदस्य विनयजी सहस्त्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजपा की ओर सें दमन में आयोजित क्षेत्रीय पंचायती राज्य परिषद में `ग्रामीण विकास तथा जल शक्ति' विषय पर मार्गदर्शन किया। भाजपाकें राष्ट्रीय महासचिव कैलाश जी विजयवर्गीय द्वारा आयोजित परिषदमें देशभर कें निर्वाचित जिला पंचायत, परिषद, एडीसी अध्यक्ष-उपाध्यक्ष सामील हुए है। इस परिषद मे माजी राज्यसभा सांसद विनयजी सहस्रबुद्धे की भी उपस्थिती थी।
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी सुरू केलेल्या 'मेरी माटी, मेरा देश' उपक्रमांतर्गत दमण येथे वृक्षारोपण केले.या वेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांची उपस्थिती होती.
भारताच्या फाळणीच्या कटू आठवणींचे स्मरण करीत बळी गेलेल्या बांधवांना आदरांजली वाहण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या विभाजन विभीषिका स्मृतिदिनी शहापूर येथे मूक मोर्चा व मशाल रॅली काढण्यात आली. या मोर्चाच्या वेळी शेकडो नागरिकांनी मृत बांधवांना आदरांजली वाहिली. या मोर्चात भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, ज्येष्ठ नेते दशरथ तिवरे, अशोक इरनक, विवेक नार्वेकर आदी सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्ताने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या `मेरी माटी, मेरा देश' अभियानाचा भिवंडी महापालिका क्षेत्रात शुभारंभ करण्यात आला. भिवंडीत झालेल्या कार्यक्रमात वीरांना वंदन, वसुधा वंदन आणि पंचप्राण शपथ घेण्यात आली. या वेळी माजी नगरसेवक मनोज काटेकर, सुभाष माने, सुमित पाटील, महापालिका आयुक्त अजय वैद्य आदींची उपस्थिती होती.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा मुख्य सोहळा लाल किल्ल्यावर उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी व खासदारांच्या उपस्थितीत या सोहळ्याला उपस्थित राहून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांचा संदेश ऐकला. या संदेशाने जनतेत काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली.
मराठी भाषेचा प्रचार व प्रसार जगभर होण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने वरळी येथे आयोजित केलेल्या विश्व मराठी संमेलनाला आज भेट दिली. राज्याचे मराठी भाषा विभाग मंत्री श्री. दीपक केसरकर यांनी माझे स्वागत केले. राज्य सरकारने मराठी भाषेसाठी केलेला हा प्रयत्न स्तुत्य आहे. या संमेलनासाठी नियोजित कार्यक्रमात नसतानाही, केवळ मराठी भाषेच्या प्रेमानेच मी खेचून आलो, अशी भावना व्यक्त केली. त्याचबरोबर मराठी माणसाने प्रत्येक क्षण मराठी व मराठी भाषा म्हणून जगले पाहिजे. दहीहंडी या एकमेव मराठी खेळात मराठी माणूस एकमेकांचे पाय ओढत नाही. तर पुढे जाण्यास मदत करतो. अशी दहीहंडी आपण दररोज बांधू शकत नाही. या संमेलनाच्या माध्यमातून वैचारीक पातळी वाढविण्याबरोबरच वैचारीक दहीहंडी बांधण्याचा प्रयत्न करायला हवा, असे आवाहन मी केले. जगभरातील प्रत्येक मराठी व्यक्तीने संधी मिळेल, तेथे मराठी भाषा बोलून मराठीला पुढे न्यावे. तसेच सर्व देशांत मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प करावा. आपल्या मराठी बरोबरच मराठी माणूसही मोठा झाला पाहिजे. या संमेलनाला उपस्थित परदेशस्थ मराठीजनांनी एखादे गाव दत्तक घेऊन गावाचा विकास करावा, अशी सुचना मी संमेलनात केली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याचा शेवटचा टप्पा बदलापूरमध्ये सुरू झाला. हेंद्रेपाडा येथे बदलापूर पूर्व व पश्चिम विभागाचा संघटनात्मक मेळावा पार पाडला. या मेळाव्यात श्री. बावनकुळे यांच्याबरोबरच माझ्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर `संवाद भाजपाच्या मित्रांसोबत' कार्यक्रमान्वये त्यांनी विविध मान्यवर व्यक्तींबरोबर मनमोकळेपणाने चर्चा केली. तसेच केंद्र व राज्य सरकारबद्दल त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. या दौऱ्यात बंजारा समाजातील बंधू-भगिनींबरोबरही त्यांनी संवाद साधला. तसेच राष्ट्रीय किर्तन महोत्सवाला भेट देऊन वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. भाजपाचा सोशल मिडिया विभागाची जबाबदारी असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून विविध सुचनाही केल्या.
नागपूरच्या दौऱ्यात विधिमंडळात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याबरोबर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विकासकामांविषयी 'एमएमआरडीए'कडे असलेल्या प्रस्तावांबाबत सविस्तर चर्चा केली.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.